Advertisement

प्रसूतीनंतर महिलेचे निधन

प्रजापत्र | Tuesday, 31/05/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.३१ (वार्ताहर)-तालुक्यातील व्हरकटवाडी येथील शेतकरी महिलेचे प्रसूतीनंतर निधन झाल्याची घटना मंगळवारी (दि.३१) सकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

        वैष्णवी रखमाजी व्हरकटे (वय-१९) मयत महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी वैष्णवीची प्रसूती लातूर येथील शासकीय रुग्णालयात झाली. तेव्हापासून ती कोमात होती. मंगळवारी सकाळी वैष्णवीची प्राणज्योत मावळली. मात्र बाळ सुखरूप असल्याचे नातेवाईकांकडून समजले. वैष्णवीच्या निधनाचे वृत्त व्हरकटवाडीत कळताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. व्हरकटवाडी गावच्या सरपंच ललिता रामकिसन व्हरकटे यांची ती वहिनी होत. वैष्णवी पश्चात सासू-सासरे, पती व एक लहान नवजात बालक आहे.

Advertisement

Advertisement