बीड दि.२५(प्रतिनिधी)-अभ्यासाच्या तणावातून एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना बीड शहरातील शिवतेज कॉलनी (पांगरी रोड) मध्ये घडली आहे.याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली.
वरद मनोजसिंग जव्हेरी (वय-२१) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.तो सीए व बीकॉमच्या वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.मंगळवारी वरदची आई आपल्या नातेवाईकांकडे बारामतीला गेली होती.तर वडील जिवनसिंग जव्हेरी धोंडिपुरा येथील अकाऊंटच्या ऑफीसमध्ये होते.रात्री ९.३० च्या सुमारास जिवनसिंग घरी गेल्यानंतर वरदने आपल्या रूममध्ये गळफास घेतल्याचे समोर आले.दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून वरदने अभ्यासाच्या तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याचे चुलते संतोष जव्हेरी यांनी सांगितले.मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून शिवाजी नगर पोलीस आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा