Advertisement

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाचे समन्स

प्रजापत्र | Tuesday, 24/05/2022
बातमी शेअर करा

बीड : गेवराई तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी केलेल्या आत्महत्येची दखल आता मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. याप्रकरणात तातडीने अहवाल देण्याचे आदेश आयोगाने दिले असून १३ जून रोजी आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी साखर आयुक्त आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना बजावण्यात आले आहे.

 

गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊसउत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी उसाच्या फडाला आग लावून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अतिरिक्त उसाची प्रशासनाने दखल न घेतल्याने ही आत्महत्या झाल्याचे माध्यमांनी मांडले होते. आता मानवी हक्क आयोगाने या आत्महत्येची स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात तातडीने अहवाल दाखल करण्याचे आदेश आयोगाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याच्या साखर आयुक्तांना दिले आहेत. या प्रकरणात १३ जून रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्तांनी हजर राहावे म्हणून आयोगाने समन्स बजावले आहे. 
 

Advertisement

Advertisement