Advertisement

कारच्या धडकेत शिक्षक ठार

प्रजापत्र | Sunday, 22/05/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.22 मे – धारूर केज रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग (548 सी) वर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या दरम्यान एका भरधाव वाहनाने एका पादचारी शिक्षक गणेश नागनाथ मिठेवाड (वय 40) यांना उडवल्याने ते या अपघातात जागीच ठार झाले. मात्र हे वाहन पसार झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रविवारी सायंकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.

 

धारूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या दरम्यान रविवारी (दि.22 मे ) रोजी रात्री साडे आठ च्या दरम्यान रस्त्याने पायी चालणारे पादचारी शिक्षक गणेश नागनाथ मिठेवाड हे चालत असताना एका भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांना उडवले. या अपघातात ते जागेवर गंभीर जखमी होवून ते जागीच ठार झाले.

 

संबंधित धडक देऊन जाणारे वाहन हे पसार झाले असून पोलीस या वाहनाचा शोध घेत आहेत. गणेश मिठेवाड यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्यावर ते जागीच ठार झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मिठेवाड हे जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

( Terrible accident in Dharur city; Teacher killed. )

Advertisement

Advertisement