Advertisement

बैलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

प्रजापत्र | Monday, 16/05/2022
बातमी शेअर करा

केज दि.१६ – बैलाचे शिंग लागून जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथे घडली आहे.

                  रामहरी उत्तमराव चंदनशिव हे 50 वर्षीय शेतकरी दि.१५ रोजी सायंकाळी शेतात बैलाला वैरणकाडी करत असताना बैलाने शिंग मारून त्यांना जखमी केले. सदरील शेतकऱ्याच्या गळ्यावर शिंग लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीला केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र अवघ्या कांही तासातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सदरील कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Advertisement

Advertisement