Advertisement

जिल्हा परिषद गट गण रचनेचा कार्यक्रम जाहीर

प्रजापत्र | Wednesday, 11/05/2022
बातमी शेअर करा

बीड-राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरु झाली असून नगर पालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समित्यांची गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जून महिन्याच्या अखेरीस जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना पूर्ण झालेली असेल.बीड जिल्हापरिषदेतील ६९ गट आणि ११ पंचायत समित्यांच्या १३८ गणांसाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 
राज्य निवडणूक आयोगाने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 

  • गट,गण  रचनेचे प्रारूप आयुक्तांकडे पाठविणे : २३ मे २०२२ 
  • त्या आराखड्यांना आयुक्तांनी मंजुरी देणे : ३१ मे २०२२ 
  • प्रारूप गट गण रचना प्रसिद्धी :  २ जून २०२२ 
  • प्रारूप रचनेवर आक्षेप : ८ जून २०२२ 
  • आक्षेपांवर सुनावणी घेऊन अंतिम स्वरूप देणे :  २२ जून २०२२ 
  • अंतिम गट गण रचनेची प्रसिद्धी :  २७ जून २०२२ 

असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. म्हणजे २७ जून नंतर जिल्हापरिषद पंचायत समित्यांचे  मतदारसंघ अंतिम झालेले असतील. आणि त्यानंतर निवडणुकीचा रंग चढणे सुरु होईल. 
 

Advertisement

Advertisement