Advertisement

सख्ख्या भावांच्या दुचाकीचा अपघात

प्रजापत्र | Tuesday, 10/05/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर- तालुक्यातील तेलगाव येथे दुचाकीवरुन जात असलेल्या दोन सख्ख्या भावावर काळ ओढावला. ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.

    तेलगाव येथे आज मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आदित्य शंकर राठोड असे मयताचे नाव आहे.बाबीतांडा येथून आदित्य व अभिजित शंकर राठोड हे सख्खे भाऊ मोटारसायकल वरुन तेलगावकडे येत असताना कलंत्री पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. यात आदित्य (वय 20) याचा जागीच मृत्यू झाला तर अभिजित शंकर राठोड (वय 22) गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Advertisement

Advertisement