Advertisement

अंगावरून पिकअप गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 07/05/2022
बातमी शेअर करा

केज दि.७ – पिकअप पाठीमागे घेताना एका ६० वर्षीय शेतकऱ्यास जोराची धडक देत अंगावरून पिकअप घातले. या अपघातात गंभीर शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मस्साजोग ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

      मस्साजोग येथील शेतकरी गंगाधर भानुदास कदम ( वय ६० ) हे ४ मे रोजी सकाळी ९ वाजता शेतातून गावात येत होते. ते रस्त्यावर आले असता कोंबड्याचे पिकअप ( एम. एच. ४४ एव्ही १५०१ ) रिव्हर्स घेताना चालकाने हायगयी व निष्काळजीपणे चालवून गंगाधर कदम यांना जोराची धडक देत त्यांच्या अंगावरून पिकअप घातले. या अपघातात गंभीर झालेले गंगाधर कदम यांना तातडीने अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही मिनिटात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

           दरम्यान, अशोक गंगाधर कदम यांच्या फिर्यादीवरून पिकअप चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पिकअप चालक फरार असून पुढील तपास पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement