Advertisement

१५ हजारांच्या लाच प्रकारणी सहा.पोलीस उपनिरीक्षकासह एकाला अटक

प्रजापत्र | Friday, 29/04/2022
बातमी शेअर करा

जगन सरवदे 
अंबाजोगाई-येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहा.पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस नाईकला १५ हजारांच्या लाच प्रकरणी आज (दि.२९) सायंकाळी ६ च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.२९) पकडले आहे.या कारवाईमुळे अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली. 
नितीन चंद्रकांत चौरे (वय-३३, पोलीस नाईक), प्रमोद प्रताप सेंगर (ठाकूर) (वय-५१ सहा.पोलीस उपनिरीक्षक) अशी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीसांची नावे आहेत. चौरे व सेंगर यांनी तक्रारदारास त्यांचे कुटुंबियांवर शेतीचे कारणावरून दाखल गुन्ह्यात तपासात मदत करून, पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाई तहसीलदार कार्यालय अंबाजोगाई येथेच करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. ही लाच 28 फेब्रुवारी 2022 रोजी मागितली होती. 2 मार्च 2022, 3 मार्च 1 एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. म्हणून याबाबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन्ही लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपळा पथक पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हात्रे यांनी केली.

Advertisement

Advertisement