Advertisement

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली शिक्षकाला दीड लाखाला गंडा

प्रजापत्र | Thursday, 28/04/2022
बातमी शेअर करा

परळी वै.दि.२८ (वार्ताहर)-ऑनलाईन फसवणूकीच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून परळीतील एका शिक्षकाला अशाचप्रकारे फसवणूकीला सामोरे जावे लागले आहे.शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली शिक्षकाला दीड लाखाला गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

    नेताजी शिवाजीराव देशमुख असे त्या शिक्षकाचे नाव आहे.अज्ञात आरोपीने तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत माहिती देवुन शेअर मार्केटमध्ये डी मॉट खाते सुरू करण्यासाठी व तुम्हाला शेअर मार्केटमधून जास्तीत जास्त फायदा होईल असे सांगत १ लाख ५७ हजारांची ऑनलाईन फसवणुक केली.याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement