Advertisement

महिलेवर सामूहिक बलात्कार

प्रजापत्र | Monday, 25/04/2022
बातमी शेअर करा

बीड : नात्याने चुलत पुतण्या असलेल्या एकाने आपल्या चुलतीवरच बलात्कार केल्याचा तसाच त्याच गावातील इतरांनी पीडितेला धरून आणखी एकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

 

बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एका २४ वर्षीय महिलेला तिच्या नात्यातील चुलत पुतण्या असलेल्या अजय भाऊसाहेब गवते याने अहमदनर येथील एका लॉजवर नेऊन ११एप्रिल रोजी तिच्यावर बलात्कार केल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. तसेच दुसऱ्या दिवशी त्याच गावातील दत्ता मुरलीधर गवते , परमेश्वर नारायण गवते आणि पप्पू उर्फ प्रकाश नरहरी गवते यांनी पीडितेला बीड जिल्ह्यातील काटवटवाडी येथील विहिरीजवळ नेले आणि त्याठिकाणी पप्पू उर्फ प्रकाश याने पीडितेवर अतिप्रसंग केल्याची फिर्याद पीडितेने बीड ग्रामीण पोलिसात दिली आहे. यावरून बीड ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Advertisement

Advertisement