जगन सरवदे
अंबाजोगाई-येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या लातूर हायवेवरील नंदगोपाल दूध डेअरी पायगावजवळ शनिवारी (दि.२३) सकाळी ट्रक-क्रुझरच्या भीषण अपघातात आठ जागीच ठार झाल्याची भीषण घटना समोर आली आहे.या अपघातात सात महिला आणि एका पुरुषाचा मृत्यु झाला असून घटनास्थळी रक्त आणि मांसाचा सडा दिसत आहे.
मयत लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.हे सर्व जण आज सकाळी उत्तमराव गंगणे (रा.राडी) यांच्याकडे कार्यक्रमाला जात असताना ट्रक आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात सात महिलांचा आणि कार चालकाचा जागीच मृत्यु झाला असून या भीषण अपघातामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अद्याप मयताची नावे समोर आली नसून घटनास्थळी अंबाजोगाई पोलीस दाखल झाले आहेत.
बातमी शेअर करा