Advertisement

केज शहरात मध्यरात्री दोन ठिकाणी दरोडा

प्रजापत्र | Thursday, 21/04/2022
बातमी शेअर करा

केज दि.२१ – येथे दि. २१ एप्रिल रोजी मध्यरात्री सोन्याचे दुकानाचे शटर तोडून आणि एका पत्र्याच्या डब्याचे कुलूप तोडून दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

 

 

                  केज पंचायत समितीच्या आवारात सेवा निवृत्त मुख्याद्यापक अर्जुन रोडे यांचे विरा ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. दि. २१ एप्रिल रोजी मध्यरात्री चोरट्यानी शटर कटरच्या साहाय्याने कापून एकाने आत प्रवेश केला आणि दुकानातील सोन्या चांदीचे २२ हजार रु किंमतीचे दागिने घेऊन पोबारा केला. दरम्यान चोर आल्याची माहिती पोलिसांच्या गस्ती पथकाला मिळताच पोलिसांची चाहूल लागताच चोरटे पल्सर मोटार सायकली वरून पळून जाण्याचा यशस्वी झाले. पोलिसांच्या गस्ती पथकातील पोलीस नाईक उमेश आघाव, अशोक गवळी आणि वाहन चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कादरी यांनी चोरट्यांचा पाठलाग केला परंतु अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरटे पसार झाले. तसेच केज येथील उमरी रस्त्यावर असलेल्या सहयोग नगर येथही बाबासाहेब शिवाजी काळे हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्यांच्या पत्र्याच्या डब्याचा दरवाजा उघडून आतील नगदी ८ हजार रु आणि तीन ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

 

 

घटनास्थळी श्वान पथक :- घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
चोरट्यानी साहित्य ठेवून पळ काढला :- चोरट्याना पोलीस येत असल्याचे जाणवताच त्यांनी विरा ज्वेलर्स मध्ये शटर तोडण्यासाठी त्यांनी वापरलेले कटर ठेवून पळ काढला. जर पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर चोरट्यानी लोखंडी तिजोरी फोडून आतील ऐवज चोरला असता गेला असता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

 

 

चोरटे सीसीटीव्हीत कैद :- विरा ज्वेलर्स दुकानात शटर अर्धवट उघडून एकजण आत गेलेला इसम असून अंगावर पांढरे कपडे, डोक्यावर पांढरी गोल टोपी व चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला असून त्याची उंची अंदाजे साडेपाच फुटा पेक्षा जास्त असल्याचे दिसते.
 

 

Advertisement

Advertisement