किल्लेधारूर दि.20 एप्रिल – धारुर (Dharur) शहरातील किसान सभेचे कार्यकर्ते ज्ञानदेव बोराडे (वय 50 वर्ष) यांचे धारुर माजलगाव रस्त्यावर तेलगाव नजीक मोटार सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच निधन (Accidental death) झाले.
मिळालेल्या माहितीनूसार आज दि.20 बुधवारी सांयकाळी 4 ते 5 च्या सुमारास मोटर सायकल क्र एम एच 44- एल 7049 या मोटरसायकल वरुन ज्ञानदेव बोराडे काम आटोपून धारूरला येत होते. तेलगाव पासून जवळच त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याची चर्चा आहे. या अपघातात (Accident) ज्ञानदेव बोराडे रा. उदयनगर, धारुर यांचे जागेवरच निधन झाले.
तेलगाव ते माजलगाव (Majalgoan) या राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र. 548 सी या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. माजलगाव येथे खाजगी पेट्रोल पंपावर बोराडे नोकरी करत असल्याचे कळते. ते किसान सभेचे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परीवार आहे. निधनाचे वृत्त कळताच किसान सभेच्या कार्यकर्त्यांतून दुख व्यक्त केले जात आहे.
( Accidental death of Dharur activist; Incident on Dharur-Majalgaon road. )