केज दि.१९ - केज कळंब रोडवर बुध्दसृष्टी जवळ असलेल्या पुलावर मोटार सायकल अपघातात पती-पत्नी जखमी झाले आहेत.
दि. १८ एप्रिल सोमवार रोजी केज-कळंब महामार्गावर बुध्दसृष्टी जवळच्या पुलावर काशिनाथ महादेव राऊत वय (४८ वर्ष) व त्यांची पत्नी (४० वर्ष) हे मोटार सायकल क्र (एम एच ४४/डब्ल्यू- ०१७१) साळेगावकडे येत असताना रात्री ९ वा. दरम्यान त्यांचा अपघात झाला. अपघातात काशिनाथ राऊत यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे.
पतीपत्नीवर उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे प्रथमोपचार करण्यात आले. काशिनाथ राऊत यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविले आहे.
दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पुलावर मागच्या अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून वाहतूक एकेरी वाहतूक सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या सूचनेवरून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आहे.