केज दि.9 – तालुक्यातील पिसेगाव येथे शेळ्यांनी भुईमुगाचे पीक खाल्ल्याच्या संशया वरून भांडण होऊन एका ६५ वर्षाच्या वृद्ध महिलेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
केज तालुक्यातील पिसेगाव येथे दि. ६ एप्रिल रोजी रुक्मीनबाई विठठलराव नेहरकर वय (६५ वर्ष) या वृद्ध महिलेला तुझे भुईमुगाचे पीक आमच्या शेळ्यांनी कुठे खाल्ले ? असे म्हणून त्यांच्या भावकितील चौघांनी भांडणाची कुरापत काढून भांडण केले.
रुक्मिणीबाई नेहरकर हिचे अनीता सोपान नेहरकर हिने गचुरे धरुन ढकलुन देवुन खाली पाडले. नंतर तिचा पती सोपान विष्णु नेहरकर याने त्याचे हातातील कुऱ्हाडीच्या दांडयाने डाव्या हातावर मारुन हात फ्रॅक्चर केला. तर कृष्णा सोपान नेहरकर आणि आशीष भागवत नेहरकर यांनी कमरेच्या बेल्टने हाता पायावर, पाठीवर मारुन मुक्का मार दिला. तसेच सर्वानी मिळुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
सदर प्रकरणी रुक्मीनबाई विठठलराव नेहरकर यांनी दि. ९ मार्च रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार अनीता सोपान नेहरकर, सोपान विष्णु नेहरकर, कृष्णा सोपान नेहरकर आणि आशीष भागवत नेहरकर सर्व रा. कुंडुळीवस्ती पिसेगाव ता. केज. जि. बीड या चौघांच्या विरुद्ध गु.र.नं. ११५/२०२२ भा.दं.वि. ३२६, ३२३, ५०४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ हे पुढील तपास करीत आहेत.