विडा दि.३ – केज तालुक्यातील विडा येथे जीवघेण्या वळणावर अपघात झाला असून यात पहाडी पारगाव येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
बेंगळवाडी येथे घरगुती कार्यक्रम उरकून पहाडी पारगाव ता. धारूर येथे परतत असताना सदरील ठिकाणी एम.एच.44,.आर 1709 मोटारसायकल चा अपघात झाला. श्रीहरी अंडील (वय 60) आणि विकास कप्पे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, विडा येथील त्या त्रिफळ्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून काहींना तर जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे अश्या धोकादायक वळणावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कांहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे.
बातमी शेअर करा