बीड दि.२ - केज तालुक्यातील तांबवा येथील गणेश विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षकाचा थकीत पगार व इतर भत्ते काढण्यासाठी तसेच शिक्षका विरोधातील याचिका मागे घेण्यासाठी 12 लाखांची मागणी केली. मात्र त्यातील दीड लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना दोन संस्थाचालक, एक मुख्याध्यापक व अन्य एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याची घटना घडली आली आहे.
तालुक्यातील तांबवा येथील गणेश विद्यालयातुन एक शिक्षक मागच्या वर्षी सेवानिवृत्त झाले.मात्र सेवकाळात त्यांच्यात आणि संस्थेत कांही वाद निर्माण झाल्याने सदरील शिक्षकास संस्थेने शाळेतून काढले होते.परंतु सदरील शिक्षक न्यायालयीन लढाई लढून पुन्हा रुजू झाले होते. त्यानंतर ते कांही वर्षे सेवा करून निवृत्त झाले.मात्र त्यांचे मागील काळातील लाभ निवृत्त झाले तरी मिळाले नव्हते. उलट सदरील शिक्षकावरच संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मात्र मागील सेवेचे लाभ देण्यासाठी व याचिका मागे घेण्यासाठी संस्थेचे सचिव अशोक हरिभाऊ चाटे, मुख्याध्यापक अनंत बाबुराव हंगे, साने गुरुजी विद्यालयाचे अध्यक्ष उद्धव माणिक कराड व दत्ता सूर्यभान धस यांनी सदरील शिक्षकाकडे 12 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन एप्रिल रोजी सापळा रचला असता मेन रोडवरील भगवान मेडिकल स्टोअर वर वरील चौघांना दिड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरील कारवाई लाप्रवी चे पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे व पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली.