Advertisement

किल्ल्याशेजारच्या दरीतील 'त्या' मृतदेहाची पटली ओळख

प्रजापत्र | Monday, 28/03/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-येथील किल्ल्याच्या शेजारील लाला खडक येथील दरीत आज (दि.२८) अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता.अखेर या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह एका मुकदमाचा असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. 
       नवनाथ धपाटे (वय-६०) असे त्या मयत इसमाचे नाव आहे. धारूर येथील किल्ल्याच्या बाजूस असलेल्या लाला खडक दरीत  सकाळी एक पुरूष जातीचे प्रेत आढळले. हि घटना समजताच धारूर पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रेताची पहाणी केली असता त्यांचे खिशात आधार कार्ड सापडले. त्या वर नवनाथ धपाटे असे नाव होते. संबंधीत मयताचे नातेवाईकाशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलवले असता या प्रेताची ओळख पटली. हे मुकदम  नवनाथ धपाटे (वय-६०) वर्ष यांचे असल्याचे निष्पन्न झाले असून या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदन अहवाला नंतर हे स्पष्ट होणार असून शुक्रवार पासून ते बेपत्ता  असल्याचे समजते, या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement