बीड-देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढू लागल्याने वाहनधाराकांच्या अडचणी वाढल्या आहेत. शनिवारी ही पेट्रोल ७९ पैसे तर डिझेल ७८ पैशांनी महागले. त्यामुळे बीडमध्ये पेट्रोल ११४.७९ तर डिझेल ९७.३१ रुपये लीटर झाले होते.
देशात २१ मार्चपासून सुरु झालेली इंधनदरवाढ सर्वसामन्यांसाठी जीवघेणी ठरु लागली आहे. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ८३ पैश्यांनी महागल्यानंतर शनिवारी पेट्रोलमध्ये ७९ पैसे तर डिझेलमध्ये ७८ पैश्यांची वाढ करण्यात आली आहे.दरम्यान सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे वाहन धारकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बातमी शेअर करा