Advertisement

ट्रॅक्टरखाली येवून एकाचा तर ट्रकला धडकून दुसऱ्याचा मृत्यू

प्रजापत्र | Friday, 25/03/2022
बातमी शेअर करा

किल्ले धारूर दि.25 मार्च - धारुर तालुक्यातील भोपा येथे ट्रॅक्टरखाली येवून एका तरुणाचा तर या अपघातामुळे झालेल्या ट्राफिकमध्ये अडकलेल्या ट्रकला धडकून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज रात्री 8 च्या सुमारास घडली.

 

याबात मिळालेल्या माहितीनूसार, बीड परळी महामार्गावरील भोपा या तेलगावजवळ असलेल्या गावात लक्ष्मी व्यंकटेश जिनिंग जवळ दोन ट्रॅक्टरच्या मध्ये बुलेट दुचाकी येऊन शेख शकील शेख दगडू (वय 29) रा.भोपा हा तरुण चिरडल्या गेला. या अपघातात तरूण घटनास्थळीच मयत झाला. 

 

या अपघातामुळे जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत ट्राफिक जाम झाला होता. याच ट्राफीकमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकवर गणेश राजेभाऊ मुंडे (वय 27) रा. कोठरबन ता. वडवणी हा तरुण दुचाकीवरून येत असताना धडकला. घटनास्थळीच त्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

 

या दुर्दैवी अपघातामुळे दोन तरुणांना जीव गमवावा लागला. यामुळे भोपा व कोठरबन गावात शोककळा पसरली. घटनास्थळी दिंद्रुड पोलिस दाखल होवून दोन्ही मयत तरुणांना धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवले असल्याची माहिती मिळाली.

Advertisement

Advertisement