Advertisement

UPI आणि नेट बँकिंगचा वापर करताय?, मग पासवर्ड बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजापत्र | Friday, 25/03/2022
बातमी शेअर करा

सध्या अनेकांकडून डिजीटल पेमेंटचा वापर वाढत चालला आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि इतर किरकोळ व्यवहार करतानादेखील अनेकांकडून युपीआय पेमेंट अथवा नेट बँकिंगचा वापर करण्यात येत आहे. करोना महामारीमध्ये बेरोजगारी वाढल्याने सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार सिम केवायसी, बँक केवायसी करत असून नातेवाईक असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत आहेत. अनेक वेळा, सायबर गुन्हेगार बँक किंवा UPI फिनटेक कंपनीचे एजंट असल्याचे दाखवून, केवायसीच्या नावाने आवश्यक माहिती जसे की पिन आणि पासवर्ड मिळवून तुमची फसवणूक करतात. सायबर फसवणुकीचा हा प्रकार टाळायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

 

 

ऑनलाइन व्यवहारांमुळे फसवणूक वाढली – करोना महामारीमध्ये अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी एटीएम व्यवहार करण्याऐवजी ऑनलाइन बँकिंग आणि यूपीआयद्वारे घरबसल्या व्यवहार करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने लोकांना आपला शिकार बनवत आहेत.

 

 

प्रत्येक खात्याचा पासवर्ड वेगळा ठेवा – सायबर गुन्हे टाळण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी सल्ला देत असते. यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड इत्यादी वेगवेगळ्या खात्यांचे पासवर्ड वेगळे असावेत, असा इशारा केंद्र सरकारने नुकताच दिला आहे. अनेक लोक सर्वत्र एकच पासवर्ड वापरतात. कारण ते लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. पण पासवर्ड ठेवल्याने फसवणूक होण्याची शक्यता वाढते.

 

मजबूत पासवर्ड निवडा – बरेच लोक त्यांचा पासवर्ड जन्मतारीख, लग्नाचा वाढदिवस आणि इतर तारखेच्या आधारे बनवतात जो खूप कमकुवत आणि हॅक करणं सोपं असतं. त्यामुळे जेव्हाही तुम्ही ऑनलाइन पेमेंटसाठी पासवर्ड तयार कराल तेव्हा त्यात नंबर, अल्फा बेटिक कॅरेक्टर आणि स्पेशल कॅरेक्टर ठेवा.

 

 

बँकिंग डिटेल्स शेअर करू नका – केंद्र सरकारचे ट्विटर हँडल सायबर दोस्त सायबर फ्रॉड टाळण्यासाठी टिप्स देत आहे. अलीकडेच, सायबर दोस्तने ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, आपले बँकिंग डिटेल्स कोणाशीही शेअर करू नये. याशिवाय अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
 

Advertisement

Advertisement