Advertisement

ईदला घ्यायला येणार होते वडील, त्याआधीच लेकीचा घात

प्रजापत्र | Thursday, 24/03/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२४ (प्रतिनिधी)-पाच महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका २० वर्षीय विवाहितेला तिसर्‍या मजल्यावरून फेकून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील शाहूनगर भागात गुरुवारी (दि.२४) सकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी पती, दीर व इतरांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आत्महत्या करण्याच्या दोन दिवसापूर्वी विवाहितेने वडिलांना फोन करून रडत-रडत आपल्याला सासरचे लोकं खूप त्रास देत असल्याचे सांगितले होते.मात्र यावेळी तिच्या वडिलांनी ईदला घ्यायला येतो म्हणत तिची समजूत काढली मात्र गुरुवारी सकाळी तिचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
             यासमीन शकूर शेख (२१, रा. शाहूनगर, बीड) असे मयत विवाहितेचे नाव आहे.तिचे वडील रहीम शरिफोद्दिन शेख (रा. इस्लामपुरा, पेठ बीड)यांच्या तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबर २०२१रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (वय-२९) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्री काम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली. २४ रोजी सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.

 

Advertisement

Advertisement