अंबाजोगाई-राष्ट्रवादीचे नेते राजकिशोर मोदी व त्यांचे बंधू सुप्रसिद्ध उद्योजक भूषण, सुरेश व संकेत मोदी हे आता सोने-चांदीच्या व्यवसायात पदार्पण करत आहेत.उद्या (दि.२५) महादेव महाराज चाकरवाडीकर,वेद शास्त्री सं पंडितराज श्री गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी,शंभुलिंग शिवाचार्य महाराज, अर्जुन महाराज लाड,किसन महाराज पवार,महादेव बोराडे महाराज,मौलाना अकबर इशादी यांच्या हस्ते 'मोदी ज्वेलर्स' या सोन्या चांदीच्या भव्य दालनाचा शुभारंभ होणार आहे.
मोदी बंधू यांनी यापूर्वी राजकारणासोबतच राज हॉटेल, राज मेडीकल, राज पेट्रोलियम, व बांधकाम व्यवसायात काम करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आता त्यांचे पाऊल सुवर्ण व्यवसायात पडत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून ते ग्राहकांना अतिशय शुद्ध असे २२ कॅरेट व २४ कॅरेट सोन्याची दागिने देण्याचा प्रयत्न करणार आहेत . ग्राहकांचे समाधान हेच आमचे समाधान हे ब्रीद घेऊन आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा आपण करत असल्याची माहिती मोदी बंधूनी दिली. तसेच येणाऱ्या ग्राहकांना सोने खरेदीवर आकर्षक सवलत व गिफ्ट कुपण देण्यात येणार आहे.तेव्हा अंबाजोगाई करांना अद्यावत अशी नाविन्यपूर्ण डिझाइन मध्ये सुंदर व सुबक कलाकृती असलेली सोने व चांदीची आभूषणे आता माफक दरात आपल्या अंबाजोगाई शहरातच उपलब्ध होणार असल्याने शहरवासीयांचा पैसा व वेळ याची देखील बचत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. अंबाजोगाई करांची शुद्ध व हॉलमार्क युक्त सुवर्ण आभूषण खरेदी करून वापरण्यासाठीची तृष्णा पूर्ण करण्याच्या पवित्र उद्देशाने सुरू करत असलेल्या या नाविन्यपूर्ण सुवर्ण दालनाच्या लाभ अवश्य घ्यावा व पुनः एकदा आम्हास अंबाजोगाई करांनी सेवेची संधी द्यावी असे आवाहन राजकिशोर, भूषण, सुरेश आणि संकेत मोदी यांनी केले आहे.
बातमी शेअर करा