केज दि.२१ – मागच्या कांही दिवसांपासून तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहेत. काल दोन वृद्धांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आलेली असताना आज पुन्हा बनसारोळा येथील एका तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.
दि.२० मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शुभम फुलचंद जोगी (२३) या तरुणाचा मृतदेह घरातील आडुला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलीस नाईक बी .व्ही.खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून युसुफवडगाव ठाण्यात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा