अंबाजोगाई-केज तालुक्यातील सौंदाना येथे बुधवारी (दि.१६) दुपारी १.३० सुमारास उसाच्या शेतात आग लागल्यामुळे जवळपास १५० ते २०० एक्कर ऊस जळून खाक झाल्याची माहिती शेतकरी अविनाश भिसे यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्याचा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनत असताना बुधवारी केज तालुक्यातील सौंदानामधील ऊस उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.अज्ञात कारणातून लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्याने तब्ब्ल १५० ते २०० एक्करमधील ऊस जळून खाक झाल्याच दावा शेतकऱ्यांनी केला आहे. यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा
https://youtu.be/rU_X6TQHirk
बातमी शेअर करा