Advertisement

धारूरमध्ये औषध विक्रेत्याची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 14/03/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर- येथील औषध विक्रेते शाम आप्पाराव तिडके  (वय 48 ) यांनी आज त्यांच्या  राहत्या घरी काही वेळा पुर्वी आत्महत्या  (Suicide)  केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.   
( Shocking ... Drug dealer commits suicide in Dharur city. )

धारुर (Dharur) शहरातील उदयनगर भागातील  रहिवाशी शाम आप्पाराव तिडके यांनी आज दि.14 सोमवारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पत्नी शाळेतून घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी गर्दी केली.

शाम तिडके यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मिळालेल्या माहितीनूसार तिडके हे गेल्या काही दिवसांपासून दिर्घ आजाराने त्रस्त होते. तिडके याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तिडके यांचा औषध विक्रीचा (Drug dealer) व्यवसाय आहे. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा होती. 

अद्याप पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झालेले नाहीत. पोलिस पंचनाम्यानंतर  शव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात येईल. तिडके यांच्या पत्नी या खाजगी संस्थेत सहशिक्षिका तर दोन मुलंं वैद्यकिय शिक्षण घेत आहेत. शाम तिडके यांचा मोठा मित्र परिवार असून व्यापारपेठेत हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement