Advertisement

जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक

प्रजापत्र | Saturday, 12/03/2022
बातमी शेअर करा

बीड-राज्यभरातील जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांची मुदत या महिन्यात संपत आहे. तसेच या संस्थांच्या निवडणूक किमान ४ महिने तरी घेणे शक्य नसल्याचे चित्र असल्याने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांवर ४ महिन्यांसाठी प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 
     जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपताच जिल्हापरिषदेचे सारी सूत्रे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे तर पंचायत समित्यांची सूत्रे गटविकास अधिकाऱ्यांकडे दिली जाणार आहेत. हेच अधिकारी आता प्रशासकाची भूमिका निभावणार आहेत. 
बीड जिल्हापरिषदेचे मुदत २० मार्चला संपत आहे, तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांची मुदत उद्या म्हणजे १३ मार्चला संपत आहे. त्यामुळे पंचायत समित्यांवर सोमवारपासून तर जिल्हापरिषदेवर पुढील सोमवारी (दि. २१ मार्च ) प्रशासक येईल. 

Advertisement

Advertisement