अंबाजोगाई-दि.१० : एका महिलेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील खडकपुरा भागात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.सुरेखा संदेश लोमटे (वय ४२) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना नातेवाईकांनी तातडीने येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसांत नोंद झाली नव्हती मात्र पोलिसांनी दुजोरा दिला.
बातमी शेअर करा