Advertisement

बायो डिझेलवर कुमावतांचा छापा

प्रजापत्र | Sunday, 06/03/2022
बातमी शेअर करा

केज दि.६ (वार्ताहर)-आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पुन्हा एकदा केजमध्ये बायोडिझेलवर धाडसी कार्यवाही करून दोन ट्रक आणि २ हजार ७०० लिटर बायो डिझेल सदृश्य इंधन ताब्यात घेत ४२ लाख १६ हजार रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

 

           शनिवारी (दि.५) रात्री केज तालुक्यातील कोठी येथे बोअरवेलच्या मशीन मध्ये बायोडिझेल सदृश्य बनावट इंधन भरीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्या नंतर पंकज कुमावत यांनी कोठी येथे स्वतः धाव घेऊन ट्रक (के.ए-०१/ सी-१६०७) आणि क्र. (के ए-०१/ ए के- ५६१२) या गाड्या ताब्यात घेतल्या.त्यापैकी एका गाडीत बोअर घेण्याची मशीन होती. त्या मशीनच्या गाडीत पाईप आणि मोटारद्वारे बायोडिझेल सदृश्य बनावट इंधन भरत असल्याचे कारवाईतून समोर आले.दरम्यान यावेळी पोलिसांनी दोन वाहने आणि त्यांचे चालक केरथोनम कानदासामी, पलनीवेल एल. लक्ष्मण, आर. दामोदरन रामलिंग (तिघे रा. तामिळनाडू ) यांना ताब्यात घेतले.या कारवाईत पोलिसांनी  दोन्ही वाहनातून वाहनात २ हजार ७०० लिटर बायो डिझेल सदृश्य बनावट इंधन ज्याची किंमत २ लाख १६ हजार रु. आणि दोन ट्रक व मशीनसह ४२ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, बालाजी दराडे, दिलीप गित्ते, अशोक नामदास, अमोल गायकवाड, वंजारे, वाहनचालक सहाय्यक फौजदार कादरी यांनी केली.

Advertisement

Advertisement