Advertisement

आम्ही एका छताखाली राहतो, पण....

प्रजापत्र | Thursday, 03/03/2022
बातमी शेअर करा

बीडः ' बीडमध्ये आम्ही आज तरी एका छताखाली राहतो, पण आम्ही एकमेकांचे चेहरे ही पाहत नाही, मलाही अनेकजण विचारतात, पण घर म्हणून एकत्र असलो तरी आमचे परस्पर संबंध काहीच नाहीत' या शब्दात योगेश क्षीरसागर यांनी एका छताखाली राहणाऱ्या क्षीरसागरांमधील वादावर भाष्य केले.
क्षीरसागर सर्व एकत्र राहतात पण बाहेर भांडणे दाखवितात, त्यामुळे आपण एकच आहात का? असा सवाल विचारल्यावर 'आम्ही काही सिनेस्टाईल एकमेकांकडे पाहत नाही, काकुंचे कुटुंब असल्यामुळे एका छताखाली राहतो, पण एकमेकांशी कधी बोलतही नाही' असे योगेश क्षीरसागर म्हणाले.

Advertisement

Advertisement