बीड-लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यासह १७२ गावांची तहान भागवणा-या मांजरा धरणात आज १४ आँक्टोबर रोजी संध्याकाळ पर्यंत ७६ टक्यांच्याही पुढे पाणी संचय झाला असुन धरणक्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या वर्षी धरण पुर्णक्षमतेने भरेल आणि धरणाची दरवाजे उघडण्याची वेळ प्रशासनावर येईल अशी आशा निर्माण झाली आहे.
मांजरा धरणाची संपुर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दलघमी एवढी असून आज धरणात १७१.१८३ दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजे धरण पुर्णक्षमतेने भरण्यासाठी ५४ दलघमी पाणी साठ्याची आवश्यकता आहे. आज मांजरा नदीचा प्रवाह लक्षात घेतला तर प्रति सेकंदास ४.९१८ घनमीटर एवढे पाणी धरणक्षेत्रात जमा होत आहे. धरणक्षेत्राच्या कँचमेंट एरीयात आणखी जोराचा पावूस झाला तरहे प्रमाण वाढु ही शकेल. मांजरा नदीची क्षमता प्रति सेकंदास १६६.४४२ घनमीटर एवढे पाणी धरणात आणण्याची आहे. त्यामुळे आजची परिस्थिती लक्षात घेतली तर धरण भरण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण येईल असे वाटत नाही.
मांजरा प्रकल्प
१) प्रकल्पीय पूर्ण जलाशय पातळी (FRL)
६४२.३७ मी
२) प्रकल्पीय पूर्ण पाणी साठा (G S.) १७१.१८३/२२४.०९३ दलघमी
३) प्रकल्पीय उपयुक्त पाणी साठा (L.S.)
१२४.०६३/१७६.९६३ दलघमी
४) प्रकल्पीय मृत साठा (D.S.) ४७.१३०/४७.१३० दलघमी
५) आजची पाणीपातळी (W.L.) ६४१.०२/६४२.३६ मी ( सकाळी ६:००वाजता)
६) आजचा एकूण पाणीसाठा (G S.) १७१.१९३/२२४.०९३ दलघमी
७) आजचा उपयुक्त पाणीसाठा (L.D.)
७०.११ टक्के
८) उपयुक्त पाणी साठा १७६.९६ दलघमी
९) धरणात येणारा पाण्याचा प्रवाह
(T. Inflow) ४.९१८/१६६.४४२ घनमिटर प्रती सेकंद .
बातमी शेअर करा