केज:- केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपविना मोठ्या प्रमाणावर उभा असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी तहसीलदार यांना उसाची मोळी भेट दिली.
केज तालुक्यातील शेतकऱ्याचा ऊस मोठ्या प्रमाणावर उभा असताना साखर कारखाने हे त्यांच्या क्षेत्रा बाहेरील ऊस मोठ्या प्रमाणात गाळपासाठी घेऊन येत आहेत. शेतातील उभ्या ऊसाला १२ महीन्या पेक्षा जास्त कालावधी लोटल्यामुळे त्याचे ३० टक्के वजन घटले आहे. या तफावतीची रक्कम शासनाने शेतकऱ्यांना त्वरीत द्यावी. या मागण्यांसाठी भाजपच्या वतीने आ. नमीताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उसाच्या मोळीसह तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात तालुका अध्यक्ष भगवान केदार, अक्षय मुंदडा, विजयकांत मुंडे, उपसभापती ऋषिकेश आडसकर, सुनीलआबा गलांडे, डॉ. वासुदेव नेहरकर, दत्ता धस, संदीप पाटील, मुरलीधर ढाकणे, राहुल गदळे यांच्यासह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
अंबाजोगाईत ही अंदोलन
शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासाठी बारा महिन्यांपेक्षा ज्यास्त कालावधी लोटला. परिणामी ऊसाच्या वजनामध्ये तीस टक्क्यांपेक्षा ज्यास्त घट झाली. या तफावतीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम शेतकर्यांना तात्काळ द्यावी. या मागणीसाठी भाजपाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी उपजिल्हाधिकारी यांना ऊसाची मोळी देत नुकसान भरपाईची मागणी केली. हे आंदोलन बुधवारी सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाले. या आंदोलनात आ.नमिता मुंदडा, भाजपाचे ज्येष्ठनेते नंदकिशोर मुंदडा, भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भाजपाचे उप जिल्हाउपाध्यक्ष सुनिल लोमटे, मधुकर काचगुंडे, प्रताप आपेट, हिंदुलाल काकडे, गणेश कराड, महादु मस्के, अॅड.संतोष लोमटे, आनंत लोमटे, सारंग पुजारी, वैजनाथ देशमुख, प्रशांत आदनाक, राजाभाऊ सोमवंशी, अमोल पवार, गोपाळ मस्के, प्रकाश बोरगावकर, शिरीष मुकडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.