बीडः रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या अटकपूर्व जामिनावर आता बुधवारी (दि.२) रोजी सुनावणी होणार आहे. सोमवारी अंतरिम जामिन अर्जावर पाचवे जिल्हा सत्र न्यायाधिश एस टी डोके यांच्यासमोर सुनावणी झाली. यात फिर्यादींंच्या वकिलांनी वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणी बुधवार पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे सध्या तरी भारतभुषण आणि योगेश क्षीरसागर यांना दिलासा मिळालेला नाही.
यात डॉ. भारतभुषण यांच्यावतीने मिलींद वाघिरकर यांनी बाजू मांडली.
बातमी शेअर करा