अंबाजोगाई - तालुक्यातील बर्दापुर येथे बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी छापा मारून ३२ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी लातूरच्या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
बर्दापुरातील हातोलाकडे जाणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर झटपट ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरु असून त्यातून बिनबोभाट जुगार असुरू असल्याची गुप्त माहिती बर्दापूर पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर एपीआय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली बर्दापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी झिरमिरे, सिरसट, आरदवाड यांनी सदर ठिकाणी छापा मारला. यावेळी सुभाष शिवाजी इटकर आणि संतोष दशरथ कुऱ्हाडे (दोन्ही रा. मेडीकल कलेज, आर्वी गायरान, लातूर) हे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम आणि संगणक असा एकूण ३२ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींवर बर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.