किल्लेधारूर-धारुर शहरातील एका बत्तीस वर्षीय युवकाने मुंबई येथे गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास घडली.
( Dharur youth commits suicide in Mumbai; Fifteen days ago, the migration was done in search of employment. )
धारुर शहरातील निरखी गल्ली कसबा विभाग येथील रहिवासी सय्यद वाजेद सय्यद सादेक (वय 32) याने कांदेवली, मुंबई येथे राहत्या घरात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गळफास घेतला. गळफास घेवून आत्महत्या करण्याचे कारण मात्र समोर आलेले नाही.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घटनास्थळाचा पंचनामा करत आक्समात मृत्यूची नोंद केली. सदरील मयत युवक पंधरा दिवसांपुर्वीच रोजगाराच्या शोधात मुंबईत गेला होता. नातेवाईकांकडे राहून काम करत असतानाच त्याने आत्महत्या (Suicide) केली.
मयत सय्यद वाजेद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. त्याच्या निधनाचे वृत्त धारुर (Dharur) येथे कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. अतिशय साधा व सरळ अशा स्वभावामुळे त्याचा मोठा मित्र परिवार होता. त्याच्यावर मुंबई येथेच दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती मित्राकडून मिळाली.