बीड-मागील दोन महिन्यापासून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरु असताना अखेर आता बीडच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची वर्णी लागली आहे. गत महिन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा घेतला होता.
त्या बैठकीतच जिल्हाध्यक्ष पद बदलण्याचा निर्णय झाला होता. परंतु नूतन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया बाकी होती. अखेर अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश्वरराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
बातमी शेअर करा