नोटा आणि मोबाईल वर कोरोनाचे विषाणू २५ दिवस ते २८ दिवस राहू शकतात जिवंत.
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढत संसर्ग हा संपूर्ण जगाचा काळजीचा विषय ठरला आहे. सूर्यप्रकाशात असणारे यूव्ही किरण व्हायरसला मारून टाकतात हे याआधी सिद्ध झालेलं आहे. संसर्गित व्यक्ती खोकली, शिंकली किंवा बोलली तर जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात, ते निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेले तर त्यांना कोव्हिड-19 चा संसर्ग होतो हे सिद्ध झालेलं आहे.
हवेतल्या कणांमुळे एखाद्याला संसर्ग होण्याची शक्यता आहे हेही सिद्ध झालेलं आहे. एखाद्या पृष्ठभागावर कोरोना व्हायरस आहे आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोव्हिड -19 चा संसर्ग होऊ शकतो की नाही याबाबत संशोधकांमध्ये मतमतांतरं आहेत. पण पृष्ठभागावर हा विषाणू असला तरी त्या पृष्ठभागाला हात लागल्यानंतर संसर्ग झाल्याची उदाहरणं आहेत.
नवीन संशोधनानंतर आलेला निष्कर्ष :
प्रयोगशाळेत आधी झालेल्या चाचण्यांमध्ये हे सिद्ध झालंय की कोव्हिड-19 चा विषाणू दोन ते तीन दिवस नोटा आणि काच अशा पृष्ठभागांवर जिवंत राहू शकतो. तर साधारण सहा दिवसांपर्यंत प्लॅस्टीक आणि स्टेनलेस स्टीलवर जिवंत राहू शकतो. अर्थात वेगवेगळ्या चाचण्याचे निष्कर्ष वेगळे आहेत.
पण ऑस्ट्रेलियन संस्था CSIRO च्या चाचणीत असं आढळून आलंय की कोरोना व्हायरस 'अत्यंत मजबूत' आहे. आसपासचं वातावरण साधारण 20 अंश सेल्सिअस असेल आणि खोलीत सतत अंधार असेल तर हा व्हायरस गुळगुळीत पृष्ठभाग जसं की मोबाईल फोनची स्क्रीनची काच, नोटा किंवा प्लॅस्टिकवर 28 दिवस तग धरून राहू शकतो.
बातमी शेअर करा