केज- येथे एका निनावी फोनमुळे चक्क एका प्राध्यापकांना १ लाख ४३ हजारांना गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
केज येथील समर्थ नगर भागात राहत असलेले शकील बशीर तांबोळी हे पुणे येथे एका कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वा ८९२१०५८४४५ या अनोळखी नंबर वरून एक फोन आला. त्याने सांगीतले की, तुमची केवायसी सेवा चालू ठेवण्यासाठी प्ले स्टोअर्स मधून एक ॲप डाउनलोड करा. नंतर १० रु. चे रिचार्ज करा असे सांगितले. त्या नंतर प्रा. शकील बशीर तांबोळी यांच्या बँक खात्यातून एकदा २५ हजार, दुसऱ्यांदा ४९ हजार ३५० आणि तिसऱ्या वेळी ६५ हजार रु. असे एकूण १ लाख ३९ हजार ३६५ रु. ची फसवणूक झाली आहे.
दरम्यान, प्रा. शकील बशीर तांबोळी यांनी दि. २१ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध भा.दं.वि. ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
बातमी शेअर करा