Advertisement

डॉक्टराने अश्‍लिल वर्तन केल्याची महिलेची तक्रार

प्रजापत्र | Sunday, 20/02/2022
बातमी शेअर करा

नेकनूर दि.२० (वार्ताहर)-नेहमीच वादग्रस्त असलेल्या एका डॉक्टराने आपल्याकडे तपासणीसाठी आलेल्या महिलेशी अश्लिल वर्तन केल्याचा आरोप महिलेने वैद्यकीय अधिक्षकांकडे केला आहे. याबाबत कारवाईची मागणी ही करण्यात आली असून नेकनूरमध्ये या प्रकारांमुळे खळबळ उडाली. 

 

     नेकनूरच्या कुटीर आणि स्त्री रुग्णालयामध्ये एक डॉक्टर कंत्राटी पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे उपचारासाठी एक महिला आली होती. या महिलेसोबत त्यांनी अश्लिल वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदरील महिलेने याबाबतची तक्रार वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिंदे यांच्याकडे केली. दोषी डॉक्टरविरोधात कारवाई करण्याची मागणी महिलेने केली असून याबाबतचा अहवाल डॉ. शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेने नेकनूर येथे एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement