Advertisement

वेटर समजून पाणी मागितल्याच्या रागातून एकावर चाकू हल्ला

प्रजापत्र | Sunday, 20/02/2022
बातमी शेअर करा

बीड - जेवणासाठी आलेल्या एकाने दुसर्‍यालाच वेटर समजून पाणी मागितल्याचा राग आल्याने ‘आम्ही तुला वेटर दिसतोत का?’ असे म्हणत पाणी मागणार्‍याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पोटात चाकू घुसवण्याचा प्रयत्न केला.

 

 

उमेश चत्रभुज काटकर (वय 39, रा. गजानन कॉलनी, कॅनाल रोड, शाहूनगर बीड) हे 17 फेब्रुवारी रोजी शहरातील रतन बिअरबार येथे जेवणासाठी गेले असता वेटरला पाणी मागितले मात्र तो दुसराच निघला. त्यामुळे आम्ही तुला वेटर वाटलो का, असे म्हणून सुधीर हनुमान वाघमारे, स्वप्नील शेळके (दोघे रा. चत्रभुनगर) यांनी उमेश काटकर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच चाकूने हल्ला केला. या वेळी उमेश काटकर यांनी चाकूचा वार आपल्या हाताने अडवल्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला मोठी दुखापत झाली. या वेळी उमेश काटकर यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वाघमारे आणि शेळके यांच्या विरोधात कलम 324, 323, 427, 504, 34 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement