Advertisement

पाच नगरपंचायतचे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष जाहीर

प्रजापत्र | Monday, 14/02/2022
बातमी शेअर करा

बीड-नगर पंचायतच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी,पाटोदा शिरूरमध्ये भाजपने बाजी मारली.
     बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायत साठी मागील महिन्यात निवडणूक झाली.यामध्ये तीन नगर पंचायत वर भाजपने तर केजमध्ये जनविकास आघाडीने तर वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती.सोमवारी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली.त्यात आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी पल्लवी स्वप्निल धोंडे यांची बिनविरोध निवड तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुद्धे यांची बिनविरोध निवड झाली.तसेच 

शिरूरकासार नगरपंचायत नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रतिभा रोहिदास गाडेकर तर उपनगराध्यक्षपदी श्वेता प्रकाश देसरडा यांची वर्णी लागली.पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची बिनविरोध निवड झाली असून उपनगराध्यक्षपदी शरद बांमदळे विराजमान झाले आहेत.
तसेच केज नगराध्यक्षपदी सीता बन्सोड आणि उपाध्यक्षपदी शीतल पशुपतीनाथ दांगट यांची निवड झाली.
दरम्यान वडवणी नगर पंचायतमध्ये चुरस होईल अशी शक्यता होती.मात्र सोमवारी भाजपचे आठ सदस्य गैरहजर राहिल्याने वंदना शेषेराव जगताप यांची अध्यक्षपदी आणि बन्सी मुंडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

Advertisement

Advertisement