केज दि.१० - तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी तथा भाजपचे युवानेते विष्णू घुले यांचे वडील अप्पाराव घुले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.
अप्पाराव घुले हे मागच्या कांही दिवसांपासून आजारी होते. पुणे येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
तालुक्यातील टाकळी येथे आज ५ वाजता मैनाई वस्ती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बातमी शेअर करा