Advertisement

अवैध वाळू साठ्यावर कार्यवाही

प्रजापत्र | Wednesday, 09/02/2022
बातमी शेअर करा

केज :- केज तालुक्यातील पिठ्ठीघाट येथे अवैध वाळू साठ्यावर सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कार्यवाही करीत जेसीबी आणि ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

 

याबाबतची माहिती अशी की, दि. ९ फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत अशी माहिती मिळाली की, केज तालुक्यातील पिठ्ठीघाटच्या बाजूला नदीतून वाळू उपसा करून त्याचा साठा करून ठेवला आहे. त्या साठवून ठेवलेल्या वाळूच्या ढिगातून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून त्याची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त होताच पंकज कुमावत यांनी आपल्या पथकाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या नुसार पिठ्ठीघाट येथे पथक पोहोचताच तिथे साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यातील ढिगातून एक जेसीबी ट्रॅक्टर मध्ये वाळू भरीत असल्याचे निदर्शनास आले. त्या नंतर पोलीस पथकाने सदर जेसीबी आणि ट्रॅक्टरवर कार्यवाही करून ते जेसीबी व ट्रॅक्टर हे नांदूरघाट दूरक्षेत्र पोलीस चौकीत आणून त्याच्यावर कार्यवाही केली आहे.

Advertisement

Advertisement