Advertisement

केज पोलीस ठाणे हद्दीत ग्राम सुरक्षा दल सतर्क

प्रजापत्र | Sunday, 06/02/2022
बातमी शेअर करा

 केज दि.०६ -  पूर्वीच्या काळी चोऱ्या रोखण्यासाठी गावात गस्त घालण्याची प्रथा होती. अगदी त्याच धर्तीवर आता केज पोलीसांनी गावागावात सयंस्फूर्तीने गावच्या रक्षणासाठी ग्राम सुरक्षा दलाची टीम तयार करून गावच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

 

   गावात होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस अधिकारी पंकज कुमावत त्यांनी ग्राम सुरक्षा दलाची संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी साळेगाव, नांदूरघाट आणि केज येथील शिवाजी नगर, विठाईपूरम, कामगार नगर व येथे ग्राम सुरक्षा दल गठीत करून स्वयंस्फूर्तीने गाव आणि गावातील कुटुंबाचे रक्षण करणे, गावात कोणी संशयित आढळून आल्यास त्याची माहिती पोलिसांना कळविणे, चोऱ्या आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी बैठका घेऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

 

 बैठकीला साळेगावचे सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, पत्रकार गौतम बचुटे, मधुकर सिरसट, जय जोगदंड, अक्षय वरपे हे उपस्थित होते.
 

Advertisement

Advertisement