Advertisement

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 06/02/2022
बातमी शेअर करा

आष्टी - तालुक्यातील केळसांगवी-कडा कारखाना रस्त्यालगत शेतामध्ये झाडाला एका अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून मयत इसमाचे अंदाजे वय ४५ ते ५० वर्षे आहे.

 

 

 

घटनास्थळी आष्टी पोलिसांनी धाव घेत प्रेत आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणले असून या इसमाची ओळख पटत नसून पोलीसानी फोटो मधील इसम ओळखीचा असल्यास आष्टी पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी केले आहे.

 

 

       सविस्तर वृत्त असे की,केळसांगवी-कडा कारखाना रस्त्यालागत असलेल्या शेतातील झाडाला एका ४५ ते ५० वर्षीय अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून घटनास्थळी आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस,सहाय्यक पोलीस धनवडे,पो.कॉ.संजय गुजर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणले असून त्या मयत इसमाने अंगात काळी पॅन्ट, पांढरा शर्ट,डोळ्यावर चष्मा,काळा रंग,सडपातळ बांदा असे वर्णन आहे.सदरील इसम ओळखीचा असल्यास आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस मो.8806166100,पो. कॉ.संजय गुजर 9922941874 ह्या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement