केज दि.०५ - केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गाडीला अपघात झाला असून सुदैवाने यात कुणीही गंभीर जखमी झालेले नाही.हा अपघात आज (दि.5)दुपारी 3 च्या सुमारास घडला.
माजी आमदार साठे हे केज बीड रोडने जात असताना तालुक्यातील टाकळी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली असून गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु यात सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. सदर घटना शनिवारी दुपारी तीन च्या सुमारास घडली.
दरम्यान अपघात झाला त्याचवेळी युवानेते अक्षय मुंदडा हे बीडकडून आले होते. सदर घटना त्यांनी पाहताच त्यांनी थांबून गाडीतील माजी आमदार साठे यांना व इतर दोघांना बाहेर काढून तात्काळ दवाखान्यात पाठवून दिले.
बातमी शेअर करा