Advertisement

शॉक लागून मुलाचा मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 03/02/2022
बातमी शेअर करा

केज दि.०३ – शेळ्या चारण्यास गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा विद्युत रोहित्रला चिटकून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोरडेवाडी येथील हनुमान वस्तीवर घडली.

 

 

       केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे हनुमान वस्तीवर संदीप पंजाब मस्के ( वय १५ ) हा इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तर त्याचे आई – वडील हे ऊसतोड मजूर असून साखर कारखान्यावर स्थलांतरित आहेत. संदीप हा गुरुवारी शेतात शेळ्या चारण्यासाठी गेला होता. शेतात असलेल्या रोहित्रवरील विजेचा जोराचा शॉक बसल्याने संदीप मस्के याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विडा बिटचे जमादार उमेश आघाव, विद्युत महावितरण कंपनीच्या मस्साजोग ३३ के. व्ही. विद्युत केंद्राचे कनिष्ठ अभियंता व्ही. पी. लवांडे, विद्युत कर्मचारी अक्षय मस्के, लखन करपे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Advertisement

Advertisement