Advertisement

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

प्रजापत्र | Thursday, 03/02/2022
बातमी शेअर करा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे. प्रात्याक्षिक परीक्षा दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती शरद गोसावी म्हणाले. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

 

 

बारावीची परीक्षा 4 मार्चपासून
बारावीच्या परीक्षा  4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा त्याच वेळेत 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रात्याक्षिक परीक्षा 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान घेण्यात येईल. पुर्वी ठरलेल्या पद्धतीनेच परीक्षा होतील, असं शरद गोसावी यांनी सांगितलं. बारावीसाठी 14 लाख 52 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेत. बारावीसाठी 158 विषय आहे.

शाळा तिथं परीक्षा केंद्र
दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पावणे दोन लाख कर्मचारी काम करतात. कोरोना संसर्गामुळं  दरवर्षी परीक्षा केंद्र प्रचलित असतात. शाळा तिथे केंद्र किंवा उपकेंद्र निश्चित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची शाळेमध्ये उपस्थिती कमी असल्यानं लेखी परीक्षेसाठी 40 ते 60 गुण या पेपरसाठी 15 मिनिटं देण्यात येणार आहेत. तर 70 ते 80 पेपरसाठी 30 मिनिट जादा देण्यात आला आहे, असं शरद गोसावी म्हणाले.

दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरु
दहावीची परीक्षा ही 1 मार्च ला होत असते मात्र या वर्षी आपण 15 मार्चलाच घेण्याचं आधीचं ठरवली होते.  किमान 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. दहावीसाठी प्रात्यक्षिक परीक्षा ही 40 टक्के अभ्यासक्रमावर आधारित केली आहे.  बहिस्थ परीक्षक न नेमता त्याच शाळेतील परीक्षक नेमला जाईल. प्रत्येक केंद्रावर एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने योग्य वेळेतचं केली जाईल, असं शरद गोसावी म्हणाले.

दहावी बारावीचे 31 लाख विद्यार्थी
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 31 लाख आहे.  तांत्रिक पद्धतीने ही परीक्षा घेणं शक्य नाही, त्यामुळे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेणं शक्य नाही, असं शरद गोसावी म्हणाले.

Advertisement

Advertisement