Advertisement

शॉर्टसर्किटमुळं दहा ते बारा एकर ऊस जळून खाक

प्रजापत्र | Wednesday, 02/02/2022
बातमी शेअर करा

पुणे – पुण्यातील नारायण गावात महावितरणाचा गलथान कारभार पुन्हा एकदा पाहावयास मिळाला आहे. अनेकदा शेतक-यांचं आलेलं उभं पीक जळाल्याचं आपण पाहिलं आहे. अशा घटना अपघाताने घडत असतात. परंतु त्यावर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात किंवा त्यावर उपाय काढण्यात महावितरण पुन्हा एकदा अपयशी ठरलं आहे. नारायण गावात काल अचानक कळमजाई मळ्याला अचानक आग लागली. तिथं वस्तीवर कोणीही नसल्यामुळे तिथला दहा ते बारा एकरांचा ऊस जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतीच्या कामासाठी वापरा जाणारा अमित रोहिदास भोर यांचा ट्रॅक्टर  सुध्दा जळाला आहे. घटना घडली तेव्हा तिथं कोणीही नसल्याने आग लागल्याची बातमी तात्काळ लोकांना समजली नाही.

 

आगीच्या भक्ष्यस्थानी या शेतक-यांचा ऊस 
आगीच्या झालेल्या घटनेमध्ये अनेक शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला आहे. अर्जुन भोर, विठ्ठल भोर, विष्णु भोर, इंदुबाई कुरकुटे, हनुमान खंडागळे आणि बारकु भोर या शेतक-यांचा ऊस जळाला आहे. महाविरणाचा गलथान कारभार वारंवार उघडकीस येत आहे. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आत्तापर्यंत राज्यात शॉर्टसर्किटमुळं अनेक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी अशी तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे. तसेच ऊस जळालेल्या शेतक-यांनी सुध्दा भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

महावितरणाचा गलथान कारभार 
राज्यभरात अशा घटना घडत असल्याने वारंवार महावितरण अधिका-यांंवर शेतकरी वर्गातून टीका करण्यात येते. परंतु त्यावर अद्याप महावितरणच्या अधिका-यांकडून उपाय योजना तयार झालेल्या नाहीत असं चित्र आहे. त्यामुळे असं शेतक-यांचं पीक किती दिवस जळत राहणार हे सुध्दा आपल्याला पाहावं लागेल.

Advertisement

Advertisement